दुर्गादेवीचे मंदिर
Thursday, July 28, 2011
सुभानमंगल कोटाच्या आतील बाजूला पश्चिमेच्या चित्रबेट टेकडावर एका पडक्या बुरुजावर एक छोटे मंदिर आहे.हे दुर्गादेवीचे मंदिर.एका पूर्वाभिमुख घुमटीत दुर्गादेवीची भंगलेली मूर्ती आहे.तिच्या डाव्या हाताला एक दगडी ठाणवई आहे.कधी काळी कोणीतरी देवीला सांजवात करीत असे हे त्या मेणचट शिल्पावरून वाटते.
मंदिराचे द्वार दक्षिणेला पण मूर्ती पूर्वाभिमुख आहे.शिखर अगदी लहान व हेमाडपंथी वळणाचे असून छताला कमलाकृती खोदलेला एक दगड कोरलेला आहे.काही पायर्या उतरून खाली आल्यावर एक खोलगट पडीक जागा आहे. त्या ठिकाणी विहिर होती. मंदिराचा लाकडी कळस आता दिसेनासा झाला आहे. मुसलमानांनी बांधलेल्या कोटात हिंदू मंदिर कसे? असा प्रश्न पडणे साहजिकच.तत्कालीन धर्मसहिष्णुतेचे अनेक उदाहरणांमधील हे एक उदाहरण.
Subscribe to:
Posts (Atom)